सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (08:30 IST)

घरातील लाकडी फोटो फ्रेम कशी स्वच्छ करावी या टिप्स अवलंबवा

घरातील लाकडी फोटो फ्रेम स्वच्छ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा. या मुळे आपल्याला लाकडी फोटो फ्रेम सहज स्वच्छ करता येईल. चला तर मग जाणून  घेऊ या.
 
* धूळ स्वच्छ करा - लाकडी फोटोफ्रेमची धूळ स्वच्छ करण्यासाठी मऊ मायक्रोफायबर कापड घ्या आणि फ्रेमचे कोपरे स्वच्छ करा. 
 
* प्रत्येक कोपरा स्वच्छ करा- फ्रेम वरील धूळ स्वच्छ केल्यावर प्रत्येक कोपरा स्वच्छ करा या साठी जुना टूथब्रश वापरा. हळुवारपणे टूथब्रश ने काना कोपरा स्वच्छ करा. नंतर मायक्रोफायबर कपड्याने पुसून घ्या.
 
*  क्लिनींग सोल्युशन तयार करा-लाकडी फोटोफ्रेम स्वच्छ करण्यासाठी क्लिनींग सोल्युशन तयार करू शकता. यासाठी दोन कप पाण्यात एक चमचा डिश वॉशिंग लिक्विड मिसळा. नंतर या सोल्युशन ने फ्रेम स्वच्छ करा.
 
* फ्रेम स्क्रब करा- फ्रेमला टूथब्रशने हळुवार घासून स्वच्छ करा. काचेची स्वच्छता करण्यासाठी आपण क्लिनींग सोल्युशन मध्ये एक जुना ब्रश बुडवून त्याने काच स्वच्छ करा.
 
* फ्रेम कोरडी करा- जेव्हा आपण फ्रेम चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेता आता त्या फ्रेमला चांगले कोरडे करून घ्या. या साठी आपण मायक्रोफायबर कपड्याने पुसू शकता. हे कापड पाण्याला शोषून घेतो. जेणे करून काचेवर किंवा फ्रेम वर कोणते ही डाग राहत नाही. हे आपण मोकळ्या हवेत देखील कोरडे करू शकता.