1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (09:00 IST)

होममेड फवारणी घरातील झुरळ,माशी,उंदराचा नायनाट करेल

EASY CLEANNING TIPS HOMEMADE SPRAY TO KILL RAT
घरात झुरळ,माशी ,उंदीर झाले आहेत. बाजारातील फवारणी करून देखील हे काही कमी होतं नाही आणि त्या विषारी रसायनाचा वापर करून आरोग्यास त्रास होतो. तर आज सांगत आहोत काही घरगुती होममेड फवारणी किंवा स्प्रे बद्दल ज्यांचा वापर करून घरातील झुरळ,माश्या आणि उंदीरांचा नायनाट होईल. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 पिपरमेन्ट किंवा आसमंतारा वापरा- पिपरमेन्टच्या फवारणीचा वापर करून आपण घरातून झुरळ, माशी, उंदीर कायमचे घालवू शकता. या साठी एका भांड्यात एक मग पाणी घ्या आणि त्यामध्ये पिपरमेन्ट मिसळून घोळ तयार करून स्प्रेच्या बाटलीत भरून घ्या घरातील कान्या -कोपऱ्यात या स्प्रेची  फवारणी करा. याच्या वासामुळे घरातून माशी, झुरळ,उंदीर पळून जातील या स्प्रेचा वापर आपण सतत चार ते पाच दिवस करा.   
 
2 कडू लिंबाचा रस -
ज्या प्रकारे कडू लिंब माणसाला आवडत नाही त्याच प्रमाणे झुरळ, माशी, उंदरांना देखील हे आवडत नाही. या साठी आपण एका भांड्यात चार ते पाच चमचे कडुलिंबाचा रस, कापूर आणि दोन ते तीन थेंबा रॉकेल मिसळून घोळ तयार करा.हे घोळ एका स्प्रेच्या बाटलीत भरून घरात फवारणी करा.याच्या  वासाने माशी,झुरळ,उंदीर घरातून बाहेर पळतील.  
 
3 लसूण वापरा- 
आपण घरातून झुरळ,उंदीर आणि माशी काढण्यासाठी लसणाचा वापर करू शकता. या साठी मिक्सरमध्ये लसूण,कांदा,काळीमिरी घालून वाटून घ्या आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट बाटलीत भरून घरातील सर्व ठिकाणी तसेच किचन मध्ये देखील स्प्रे करा.याच्या तीक्ष्ण वासाने घरातून झुरळ,उंदीर,माशी निघून जाईल. 
 
4 व्हिनेगर वापरा- 
व्हिनेगर देखील आपण या साठी वापरू शकता. आपण व्हिनेगर मध्ये लिंबाचा रस आणि काळी मिरपूड घालून घोळ तयार करा आणि हे घोळ बाटलीत भरून घरात स्प्रे करा. हा स्प्रे आठवड्यातून तीन ते चार वेळा करा.