गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (08:40 IST)

या हॅक्स च्या मदतीने आपण कमी वेळात घराची स्वच्छता करा.

घराची स्वच्छता मेहनतीचे काम आहे. आपण हे काही हॅक्स अवलंबवून घराची स्वच्छता करू शकतो. 

* ड्रेनेज मध्ये अडथळा-ड्रेनेज मध्ये अन्न कण साचतात किंवा घाण अडकते, यामुळे त्यातून पाणी आत जात नाही आणि पाणी बाहेर येते हे स्वच्छ करण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरू शकता. या साठी आपण व्हिनेगर आणि बेकिंग सोडा सम प्रमाणात मिसळावे. आणि ते अवरुद्ध झालेल्या सिंक मध्ये ओतावे. आपण हे सिंक झाकण बंद करून अर्धा तास तसेच ठेवून द्या .नंतर या मध्ये गरम उकळते पाणी घाला. घाण स्वच्छ होऊन साचलेले पाणी निघेल.    
 
* भिंतीवरील मेणरंगाचे डाग -
घरात लहान मुले असल्यावर घराच्या भिंती मेणाच्या रंगाने रंगणारच. मुलं मेणाच्या रंगपेटीने रंगीत कलाकारी करतात आणि भिंती खराब करतात. हे काढण्यासाठी केस वाळविणाऱ्या ड्रायरचा वापर करावा. या साठी आपण ऐका भांड्यात थोडं डिटर्जंट आणि पाणी मिसळा आणि कपड्याने रंग केलेल्या भिंतींवर पुसून घ्या नंतर ड्रायर लावा असं केल्याने भिंतीवरील रंग निघू लागतील. नंतर साबणाच्या पाण्याने स्वच्छ पुसा. भींती स्वच्छ होतील. 
 
* स्टीलच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी -
 घरातील स्टीलच्या कोणत्याही वस्तू चमकविण्यासाठी एका कपड्यावर बेबी तेल घाला आणि पुसून घ्या स्टीलच्या वस्तूंवरील डाग स्वच्छ होतील. 
 
* गंज काढण्यासाठी -
घरातील काही वस्तू गंजतात. हे गंज काढण्यासाठी बेकिंग सोड्यात पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा आणि ही पेस्ट गंजलेल्या वस्तूंवर स्क्रबरने स्क्रब करा नंतर पाण्याने धुऊन घ्या आणि स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्या. 
अशा प्रकारे आपण घराची स्वच्छता करू शकता.