Pregnancy मध्ये हे पदार्थ खाणे टाळा
गरोदर असताना खाण्यापिण्याच्या सवयींकडे खूप लक्ष द्यावं लागतं. जराशी चुक महागात पडू शकते. तसेच काही खाद्य पदार्थ असे आहेत जे प्रेग्नेंसीमध्ये खाणे टाळावे.
कच्ची अंडी
कच्च्या अंडीत सैल्मोनेला बॅक्टेरिया असल्यामुळे ताप, उलटी येणे, पोटात दुखणे तसेच लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. याने गर्भाशयात गाठी पडू शकतात ज्यामुळे प्री मॅच्योर डिलेव्हरी होण्याचा धोका वाढतो.
कॅफिन
कॉफी पिण्याची सवय असली तरी कमी प्रमाणात कॅफिन घेणे योग्य ठरेल. याने बाळाच्या वजन व विकासावर विपरित परिणाम होऊ शकतो.
स्प्राउट्स
कच्चे स्प्राउट्स खाणे योग्य नाही. यात बॅक्टेरिया आढळण्याची शक्यता असल्याने हे खाण्याची इच्छा असली तरी शिजवून सेवन करावे.
मर्करी फिश
मर्करी विषारी असतं तसेच प्रदूषित पाण्यात आढळतं. जास्त प्रमाण मर्करीचे सेवन नर्व्हस सिस्टम, इम्यून सिस्टम व किडनीला खराब करतं. मुलांच्या विकासावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. हे प्रदूषित समुद्रात आढळ्यामुळे समुद्री मासोळ्यांमध्ये मर्करी अधिक प्रमाणात आढळतं म्हणून गरोदर महिला तसेच ब्रेस्टफीडिंग करवत असणार्यांनी मर्करी आढळणारी मासोळीचे सेवन टाळावे.
हायफ्राय फिश
गरोदर महिलांना शेलफिश किंवा अर्धवट शिजवलेल्या फिशेसचे सेवन करु नये. शेलफिश सेवन केल्याने व्हायरसचा धोका असतो याचा दुष्परिणाम गर्भातील बाळावर पडू शकतो.
प्रोसेस्ड मीट
अर्धवट शिजवलेले मीट हानिकारक ठरु शकतं. हे खाल्ल्याने बॅक्टेरियल इंफेक्शनचा धोका वाढतो. याने बाळाला न्यूरोलॉजिकल आजार होऊ शकतात. म्हणून प्रोसेस्ड मीट खाणे टाळावे. स्टोरेजमुळे याने संक्रमण पसरण्याची भीति अधिक असते.
या व्यतिरिक्त अनपाश्चराइज्ड डेअरी प्रॉडक्सट्स घेणे टाळावे. तसेच कुठल्याही भाज्या व फळ खाण्यापूर्वी त्यांना व्यवस्थित धुणे अती आवश्यक आहे.