शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

ऑफिसमध्ये हिरवाई असल्यास अनुकूल परिणाम

जर ऑफिसमध्ये हिरवाई असेल तर कर्मचार्‍यांचा काम करण्याचा वेग आणि उत्पादकता वाढते, असे दिसून आले आहे. याबाबत कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संशोधन केले असून, त्यांच्या म्हणण्यानुसार अशा हिरवाईमुळे कर्मचार्‍यांचा उत्पादकतेमध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. 
 
संशोधकांनी तीन महिने हॉलंड आणि ब्रिटनच्या दोन बड्या कंपन्यांमध्ये संशोधन करून या बाबतचे निष्कर्ष काढले आहेत. दोन्ही कंपन्यांच्या ऑफिसमध्ये पुरेशा प्रमाणात झाडे-झुडपे ठेवण्यात आली. तीन महिन्यानंतर असे दिसून आले की, त्याचा अत्यंत अनुकूल असा परिणाम झालेला आहे. कर्मचारी आपल्या कामामध्ये अधिक संतुष्ट असून, ते पूर्वीपेक्षाही अधिक एकाग्रतेने व उत्साहाने ऑफिसचे काम करीत आहेत. शिवाय अशा झाडा-झुडपांमुळे इमारतीमधील प्रदूषण, धूळ आणि किटकांचे प्रमाण कमी होण्यासही मदत मिळते. त्यामुळे वातावरण अधिक स्वच्छ आणि निरोगी होते. त्याचा परिणाम कर्मचार्‍यांच्या आरोग्यावर होतो. अशा हिरवाईमुळे कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून झाले.