1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (13:09 IST)

White Hair लहान वयात केस पांढरे होत असतील तर एकदा हा सोपा उपाय करून बघा

hibiscus flower oil
आजकाल प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचेवर आणि केसांवरही वाईट परिणाम होत आहेत. केस पांढरे होण्याची बहुतेक प्रकरणे लहान वयात दिसून येत आहे. अशा स्थितीत म्हातारपणापूर्वी म्हातारा दिसण्याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.
 
केस काळे करण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी पर्यायांची अजूनही कमतरता आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक नैसर्गिक उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होईल.
 
खरं तर केसांमध्‍ये मेलेनिनचे उत्पादन कमी झाले की केस पांढरे होऊ लागतात. अशा परिस्थितीत केसांमध्ये मेलॅनिनचे प्रमाण वाढवणाऱ्या गोष्टींचा वापर करा.
 
साहित्य- 1 मूठभर कढीपत्ता, 1 टेबलस्पून मोहरीचे तेल, 1 टीस्पून मेथी दाणे, 1 हिबिस्कस फूल.
 
प्रक्रिया- रात्री झोपण्यापूर्वी कढईत मोहरीचे तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि मेथीचे दाणे टाका.
यानंतर याला थंड होऊ द्या आणि थंड झाल्यावर याला पिळून रात्रभर लोखंडी कढईत झाकून ठेवा. 
यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे मिश्रण केसांच्या मुळांवर लावा. 30 मिनिटे केसांवर राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस धुवा.
 
हा घरगुती उपाय आठवड्यातून एकदा वापरा. असे केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. लक्षात ठेवा या उपायाने तुमचे पांढरे केस काळे होणार नाहीत, फक्त काळे केस पांढरे होण्यापासून वाचतील.
 
सावधगिरी
जर तुम्हाला टाळूवर ऍलर्जी असेल तर तुम्ही हा उपाय करू नये.
तुम्हाला डोळ्यांची समस्या असली तरीही तुम्ही हा उपाय करू नये.
तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास असला तरीही तुम्हाला हा उपाय करणे टाळावे लागेल कारण मोहरीचे तेल स्ट्रांग असते आणि त्यामुळे तुम्हाला दम लागू शकतो.