शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (15:59 IST)

Postpone Periods औषधांशिवाय मासिक पाळीची तारीख वाढवायची आहे? नैसर्गिक उपाय जाणून घ्या

अनेक वेळा महिलांना काही कारणांमुळे मासिक पाळीची तारीख जरा पुढे ढकलण्याची गरज भासते अशात अनेक स्त्रिया बाजारात उपलब्ध असलेली औषधे वापरतात, त्यामुळे त्यांची तारीख काही दिवस वाढवता येते, पण याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत ज्यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं.
 
अनेक वेळा मनात प्रश्न येतात की मासिक पाळी काही आठवडे वाढवता येईल का तर याचे उत्तर होय असे आहे. वैद्यकीयदृष्ट्या अशा गोळ्या आहेत ज्या संप्रेरकांच्या प्रवाहास विलंब करण्यास मदत करतात आणि मासिक पाळी पुढे ढकलण्यात मदत करतात, परंतु कृत्रिम हार्मोनल गोळ्या किंवा औषधे घेणे प्रत्येकासाठी योग्य असू शकत नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमची मासिक पाळी काही काळ पुढे ढकलण्याचे काही नैसर्गिक मार्ग देखील आहेत, ज्याचा तुम्हाला काही काळासाठी फायदा होऊ शकतो-
 
येथे काही नैसर्गिक औषधी वनस्पती आणि औषधे आहेत जी तुमची मासिक पाळी लांबवू शकतात
 
1. ऍपल सायडर व्हिनेगर (ACV)
सफरचंद व्हिनेगर शरीराला डिटॉक्स करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले ऍसिडमुळे मासिक पाळी लांबण्यास मदत होते.
 
2. हरभरा डाळीचा वापर
प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारी चणा डाळ तुमच्या मासिक पाळीला लांबवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. भाजून बारीक केलेली डाळ कोमट पाण्यात सोबत घेतल्याने मासिक पाळी लांबवता येते. मा‍त्र याचे जास्त सेवन केल्याने पचनाच्या समस्या आणि पोट फुगणे असे त्रास उद्भवू शकतात.
 
3. जिलेटिन
जिलेटिनचा उपचार म्हणून वापर करणे आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते. गरम पाण्यात विरघळलेले जिलेटिन घेतल्याने कमीतकमी काही तासांसाठी मासिक पाळी ढकलता येते. हा एक विज्ञान-समर्थित उपाय असू शकत नाही, परंतु अशा महिला आहेत ज्या या हॅकचा वापर करतात. जिलेटिन उपचार दोनदा केला जाऊ शकतो. ते वापरण्यासाठी तुम्हाला एक कप गरम पाण्यात दोन चमचे जिलेटिन पावडर किंवा क्रिस्टल्स मिसळावे लागतील.
 
4. लिंबाचा रस
लिंबाचा रस देखील मासिक पाळी टाळण्यासाठी एक चांगला उपाय असल्याचे मानलं जातं. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. त्याच वेळी लिंबूवर्गीय अर्क देखील तुमची मासिक पाळी लांबवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
 
5. मुलतानी माती
आयुर्वेदानुसार मुलतानी मातीचा वापर केवळ त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठीच नाही तर मासिक पाळी लांबवण्यासाठी देखील एक चांगला उपाय मानला जातो. यातील काही प्राचीन युक्त्या म्हणजे महिलांनी सुमारे 25 ग्रॅम मुलतानी माती एक कप कोमट पाण्यात मिसळून मासिक पाळीच्या अपेक्षित तारखेच्या एक आठवडा आधी नियमितपणे घ्यावी. लक्षात ठेवा ही एक विज्ञान-समर्थित उपचार नाही, म्हणून उपाय अमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 
डिस्क्लेमर: आरोग्याशी संबंधित घटक केवळ माहितीसाठी आहेत, अमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.