गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (22:23 IST)

घरात डास वाढल्यास हे 5 घरगुती उपाय अवलंबवून डासांपासून सुटका मिळवा

mosquitoes
उन्हाळा सुरू झाल्यावर डासांच्या समस्या वाढतात. उन्हाळ्याच्या दिवसात डास खूप त्रास देतात. हे टाळण्यासाठी बरेच लोक कॉइल वापरतात आणि काही द्रव पदार्थ वापरतात. जोपर्यंत या गोष्टी चालू आहेत, तोपर्यंत डास इकडे तिकडे फिरकत नाहीत पण ते संपेल किंवा बंद केल्यावर ; डासांचा हल्ला सुरू होतो.
 
हंगाम बदलाबरोबरच डासांचा थैमान सुरु होतो. डासांमुळे देशभरात मलेरिया, चिकुनगुनियासारखे घातक आजार होतात. डास दूर करण्याचा किंवा संपवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी कधी ना कधी त्यांना त्यांची लपण्याची जागा सापडते. डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत, हे अवलंबवून यापासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 कॉफीचा वापर करा : कॉफीच्या माध्यमातून डासांना हाकलले जाऊ शकते, असे म्हटले जाते. त्यामुळे जिथे जिथे डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असेल तिथे कॉफी पावडर किंवा कॉफी ग्राउंड ठेवा. सर्व डास आणि त्यांची अंडी मरतील.
 
2 कडुलिंबाच्या तेलाचा वापर : आयुर्वेदात कडुलिंबाचे महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळून किंवा बॉडी लोशनमध्ये मिसळून शरीरावर लावल्यास डास आपल्या अवती भवती  फिरकणार नाहीत. याशिवाय खोलीत कडुलिंबाच्या तेलाचा दिवा लावू शकता. असं केल्याने डास घरून पळून जातील. 
 
3 लसणाचा वापर: भारतीय स्वयंपाकघरातील लसूण हा डासांसाठी उत्कृष्ट पर्याय आहे, लसणाचा रस काढा, लसणाच्या पाकळ्या मॅश करा आणि पाण्यात उकळा. स्प्रे बाटलीत भरून खोलीभर फवारणी केल्यावर तेथे उपस्थित असलेले सर्व डास पळून जातील.
 
4 पुदिन्याचा वापर : पुदिन्याच्या सुगंधाने डासांना खूप त्रास होतो असे म्हणतात. अशा परिस्थितीत घरामध्ये सर्वत्र पुदिनाच्या तेलाची फवारणी केल्यास डास आपल्या घरापासून दूर राहतील.
 
5 सोयाबीन तेल: सोयाबीन तेल देखील डासांना घालवण्यास मदत करते, अशा स्थितीत, रात्री झोपताना ते शरीरावर लावल्यास डास चावणार नाहीत, आणि आपण आजारांपासूनही वाचू शकता.