शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : बुधवार, 24 मे 2023 (22:11 IST)

लॉन्ग व्हेकेशन जाण्याचा विचार करत असाल तर या टिप्स उपयोगी ठरतील

journey summer
दररोज घर आणि ऑफिस सांभाळताना माणूस इतका थकून जातो की मूड फ्रेश करण्यासाठी तो काही न काही करण्याचे नियोजन करतो. मन ताजेतवाने करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भटकंती. नोकरी करणाऱ्या लोकांना जेव्हा जेव्हा लांबची सुट्टी मिळते तेव्हा ते प्रवासाचे बेत आखतात. यामुळे त्यांना भटकंतीही करता येते आणि यासाठी त्यांना कोणतीही विशेष रजा घ्यावी लागत नाही. जर आपण ही सुट्टीवर जाण्याचा विचार करत असाल तर येथे काही ट्रॅव्हल टिप्स आहेत ज्या आपल्यासाठी या बाबतीत उपयुक्त ठरू शकतात .
 
1 बजेटनुसार गंतव्यस्थान निश्चित करा-
सर्व प्रथम, आपले बजेट पहा आणि त्यानंतर आपले  गंतव्यस्थान निश्चित करा. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे आपण कमी बजेटमध्येही भेट देऊ शकता. आपल्याला पर्वत किंवा समुद्राची आवड असल्यास आपल्या आवडीनुसार जागेची निवड करा. या शिवाय हंगामानुसार डेस्टिनेशन निवडा, जेणेकरून तिथे जाऊन आपल्याला प्रवासाचा पुरेपूर आनंद घेता येईल.
 
2 आगाऊ तिकिटे बुक करा-
आगाऊ नियोजन करण्याचा एक फायदा म्हणजे आपण ट्रेन किंवा फ्लाइट तिकीट आधीच बुक करू शकता. आगाऊ तिकीट बुक केल्याने आपल्याला कन्फर्म सीट मिळते आणि  पैसेही वाचतात. शेवटच्या क्षणी तिकीट बुक करणे  महागात पडेल. फ्लाइट बुकिंगसाठी, प्रवास बुकिंग साइट्सना आगाऊ भेट द्या, आपल्याला यावर सवलत देखील मिळू शकते.
 
3 निवास-
राहण्याचे निवास योग्य आणि सुरक्षित असणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी हॉटेल्सची माहिती अगोदरच घ्या. तेथील रिव्युज वाचा. निवासस्थान आरामदायक असावे आणि भेट देण्याच्या ठिकाणांपासून फार दूर नसावे.
 
4 टूर आयटनरी तयार करा-
आपण कोणत्याही ठिकाणी मर्यादित वेळेसाठीच जाता, त्यामुळे तिथे सर्व काही फिरणे शक्य नसते. त्यामुळे त्या क्षेत्राबाबत अगोदरच संशोधन करा आणि पहायची असलेली ठिकाणे प्राधान्यक्रमावर ठेवून यादी तयार करा. आपल्या ओळखीच्या व्यक्तींनी तिथे भेट दिली असेल तर त्यांच्याकडून ठिकाण, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादींची माहिती घ्या. यामुळे आपल्याला खूप सुविधा मिळेल.
 
5 प्रवासाचे साधन-
कोणत्याही ठिकाणी, टॅक्सी, बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास करण्याचे साधन काय आहे हे देखील आधीच शोधा. ट्रॅव्हल ब्लॉग्स, टुरिस्ट वेबसाइट्स किंवा त्यापूर्वी त्या ठिकाणी गेलेल्या कोणत्याही ओळखीच्या व्यक्तींकडून याबद्दल माहिती मिळेल. यामुळे आपल्याला बजेटची आधीच कल्पना येईल आणि जास्त त्रास सहन करावा लागणार नाही