Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जुन्या कपड्यांचा पुनर्वापर

Updated: मंगळवार, 12 मार्च 2019 (15:20 IST)
 
शर्ट किंवा कुर्त्यापासून बनवा उशीचे कव्हर वापराविना पडून असलेले शर्ट किंवा कुर्ते उशीच्या आकारात कापा. त्यापासून खोळ बनवता येईल. तसेच उशीच्या आकाराचे काप करून त्यात कापूस भरून नव्या उशाही बनवता येतील. याध्ये फाटलेल्या पण चांगल्या सुती कपड्यांचे तुकडेही भरता येतात.
 
टेबल कव्हर- उत्तम कलाकुसर केलेल्या कपड्यांपासून खुर्च्यांसाठी कव्हर तयार केले तर ते देखणे दिसते. त्याशिवाय लेस किंवा फ्रिल काढून टेबलच्या कव्हरला, पडद्यांना लावता येतात. मुलांच्या कपड्यांवर काही वेळा कार्टूनचे पॅच असतात तेही टेबल कव्हर किंवा बेडच्या कव्हर लावून त्यांचा सुंदर पुनर्वापर करता येतो. काही कपड्यांवर देखणी कलाकुसर केलेली असते. काहींना लेस, फ्रिल्स लावलेल्या असतात. हे पुन्हा वापरात आणून छान काही तरी करू शकतो.
 
बॅग जुन्या जीन्स किंवा कार्गो पँट या खूप दिवस वापरूनही फाटत नाहीत. काही वेळा रंग उतरतो. त्याही न फेकता कपाटाच्या तळाशी ठेवलेल्या असतात. या पँटचा खिशापर्यंतचा भाग कापून वेगळा करा. वरच्या भागाच्या तळाशी व्यवस्थित टीप मारा. मग या पँटची छोटी शॉर्टस्‌ होईल किंवा वरच्या भागाला चेन लावून घेतलीत तर चांगली बॅगही होऊ शकते. तशाच प्रकारे जीन्सच्या स्कर्टचीही बॅग तयार करता येईल.
 
अन्य उपयोग
* जुन्या कपड्यांतील होजिअरीच्या टीशर्टनी स्वच्छता करता येते. विशेषतः काच साफ करताना मऊ झालेला टीशर्टवापरला तर काचेवर ओरखडे उठत नाहीत.
 
* कपड्यांवरील मोठ्या आरेखनापासून आपण फ्रेम बनवू शकतो.
 
* साडीपासून पंजाबी ड्रेस किंवा कुडता किंवा मॅक्सी गाऊनही तयार करु शकतो.
 
* प्रिंटेड कपड्यापासून लॅम्प शेड बनवू शकतो.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

तुम्हीही बटाटे चुकीच्या पद्धतीने उकळताय? 'या' ३ ट्रिक्स वापरून सेकंदात साल काढा

चायनीज ट्विस्ट, मसालेदार आणि चटपटीत शेजवान पोहा एकदा नक्की चाखून बघा

वांगी खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या; ‘या’ लोकांनी वांगी खाताना घ्या विशेष काळजी

पीएचडी म्युझिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, पगार जाणून घ्या

40 नंतर महिलांनी हे 5 Fashion Trends नक्की ट्राय करावेत

पुढील लेख
Show comments