सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

जुन्या कपड्यांचे काय करावे? कोणाला आणि कधी द्यावे असे कपडे

फाटके कपडे घातल्याने आजार, शोक आणि अनिष्ट परिणाम भोगावे लागतात. अंडरगार्ममेंट देखील फाटके घालू नये. भोकं पडलेले, फाटलेले किंवा उसवलेले अंडरगार्ममेंट घातल्याने मानसिक आजार, हृदयासंबंधी आजारांना सामोरा जावं लागू शकतं. फाटके कपडे घातल्याने ऊर्जा क्षय होते.

शुक्रवार किंवा शनिवार या दिवशी असे कपडे घराबाहेर करावे. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी शनिवारचा दिवस सर्वश्रेष्ठ ठरेल.

असे कपडे सन्माननीय किंवा संपन्न व्यक्तीला देऊ नये. जुने कपडे केवळ गरजू व्यक्तीला देणे योग्य ठरेल.

घरात स्वच्छतेसाठी जपून ठेवलेले जुने कपडे देखील खूप दिवस एका जागी राखून ठेवू नये. यांना ऊन दाखवावे. याने नकारात्मकता दूर होते.

या व्यतिरिक्त हिवाळ्यातील कपडे, रजई, गाद्या यांना देखील वेळोवेळी ऊन दाखवावे.

तसेच निरुपयोगी अंडरगामरेंट्स कुणालाही देऊ नये. असे कपडे एकत्र करून जाळून द्यावे.

नवीन कपडे परिधान करण्यासाठी शुभ दिवस, पूजा - पाठ करत असलेला दिवस किंवा बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस श्रेष्ठ ठरतील.