सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : गुरूवार, 22 जून 2023 (22:49 IST)

अशी घ्या झाडांची काळजी

फावला वेळ सत्कर्मी लागावा म्हणून आपण छंद जोपासतो. कोणी वाचन करतं तर कोणी नृच्याचे क्लास लावतं. तर आपल्यापैकी बरेचजण झाड लावून आपला फावला वेळ घालवतो. मात्र लावले्या झाडाची योग्य काळजी न घेतल्यास कालांतराने ते झाड मरते. झाड जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी विशिष्ट कौशल्याची गरज नाही. आपले नेहमीचे काम करतानाही आपण झाडांची काळजी घेऊ शकतो.
 
* सर्वप्रथम जागा किती आहे, हे पाहूनच कोणती झाडे लावावीत हे ठरवावे. नाहीतर कमी जागेत खूप झाडे लावल्यास झाडांचे पोषण होणार नाही.
 
* घरासमोर झाड लावण्यास जागा नसल्यास खिडकीत कुंडीमध्ये झाड लावावे. जाई, गुलाबासारखी फुलझाडे कुंडीत सहज लावता येतात. 
* उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हामुळे झाडांची पाणची गरज वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात कुंड्यांमधील झाडांना दोनदा पाणी द्यावे. 
 
* सुट्टीच्या दिवसात आपण घरात नसल्याने पाण्याअभावी झाडे मरण्याची भीती असते. अशावेळी पाणीसाठवणीच्या भांड्यातून सलाईनच्या छोट्या पाइपद्वारे कुंडीमध्ये झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करता येईल. थेंबाचे प्रमाण खूप मंद ठेवावे. ज्यामुळे झाडांच्या कुंडीतला मातीचा ओलावा कायम राहील.
 
* झाडांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी औषध फवारणी करावी.
 
* झाडांच्या वाळलेल फांद्या, पाने आणि फुले वेळोवेळी काढून झाडे सुदृढ ठेवावी.