बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (09:21 IST)

Toilet cleaning tips टॉयलेटला स्वच्छ ठेवण्यासाठी काही जरूरी टिप्स

toilet
Perfect toilet cleaning एक टॉयलेट फक्त तुमच्या जीवनशैलीला दर्शवतो बलकी तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्याला देखील प्रभावित करतो. जर तुमच्या टॉयलेटमधून दुर्गंध येत असेल आणि तो स्वच्छ नसेल तर असा अंदाजा लावण्यात येतो की तुम्ही किती बेपर्वा आहात, स्वच्छतेकडे तुमचे लक्ष नाही आहे. त्यासोबतच घाणीत पसरणारे बॅक्टेरिया तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यावर विपरित प्रभाव देखील टाकतात.  
 
जेव्हा एक टॉयलेट एवढे महत्वपूर्ण आहे तर त्याला स्वच्‍छ ठेवणे देखील फारच गरजेचे आहे. पण कसे? तर जाणून घ्या....  
 
काम झाल्यावर ब्रशला ठेवा कीटाणुनाशकमध्ये  
जेव्हा तुम्ही एकदा ब्रशने काम करून घेतात तेव्हा ब्रश खराब होतो. आणि हा ब्रश टॉयलेटमध्ये घाण वास निर्माण करतो. म्हणून ब्रशाला एकदा काम झाल्यानंतर पूर्ण रात्र कीटाणुनाशक किंवा ब्लीचमध्ये डुबवून ठेवावे. याने जेव्हा तुम्ही पुढे जेव्हा याचा वापर कराल तेव्हा ब्रश एकदम स्वच्‍छ राहील. कोपर्‍यात वाइपच्या जागेवर कीटाणुनाशक छिंपडावा कारण कोपर्‍यांची सफाई होणे थोडे अवघड असते.  याला नंतर वाइपने चमकवा. चमक आल्यानंतर त्याला कोरड्या कपड्याने पुसून घ्या.  
 
टॉयलेट रिमला देखील स्वच्छ ठेवावे
टॉयलेट रिमवर कीटाणुनाशक छिंपडावे कारण यावर देखील बॅक्टेरिया लागलेले असतात. त्याशिवाय या प्रकारचे ब्रश घ्यावे ज्याने हे योग्य प्रकारे स्वच्छ होऊन जाईल. यासाठी तुम्ही बेकार टूथ ब्रश कामात घेऊ शकता. सफाई करताना हातात नेहमी ग्लोव्ज घालावे.  
 
पांढर्‍या सिरक्याचा वापर करावा   
फ्लश टँकमध्ये पांढरा सिरका टाकल्याने ते केवळ स्वच्छच होत नाही तर फ्रेश देखील होईल आणि तुमच्या सेनेटरीमध्ये जमलेले हार्ड-वाटरला देखील तो काढतो. याने टॉयलेट जाम होत नाही. सिरका एक कीटाणुनाशक, स्टेन रिमुवर आहे तसेच हे 100% नॉन-टोक्सिक आहे, म्हणून याचा वापर तुम्ही करू शकता. चांगल्या सुगंधीसाठी तुम्ही सिरक्यामध्ये सीट्रोनला किंवा नीलगिरीचे तेल देखील मिसळू शकता. फ्लश टँकमध्ये रोज सिरका टाकल्याने वीकएंड जेव्हा तम्ही याला स्वच्छ कराल तर त्यात जास्त घाण जमणार नाही.  
 
योग्य प्रकारे फ्लश करा
जो व्यक्ती आपले काम झाल्यानंतर टॉयलेटला योग्य प्रकार फ्लश करतो त्याची गणना समजदार व्यक्तींमध्ये होते. फ्लश करताना ह्या गोष्टींचे देखील लक्ष ठेवायला पाहिजे की घाण परत नको यायला. म्हणून  फ्लश करताना झाकण नेहमी बंद करावे.