Daily Horoscope
✕

आवडता कुणाचा?

Updated: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (08:35 IST)
 
मुलाच्या विवाहनंतर घरी आलेल्या सुनेच्या प्रत्येक कामामध्ये चुका काढणं, तिला टोमणे मारणे, स्वत: अधिक अनुभवी असल्याचं ठामपणे सांगणं, सुनेला प्रत्येक बाबतीत हीन समजून तिला काही समजत नाही, असे सिद्ध करणे हाच जणू प्रत्येक सासूचा एकमेव उद्देश होउन जातो. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी सासू चक्क मुलालाच आधार घेते. 
 
खरं तर विवाहानंतर मुलाची संपूर्ण जबाबदारी सुनेवर पडत असल्यामुळे सुनेच्या कामात चुका कशा शोधता येतील याचाच जणू ती घेत असते. त्यामुळेच सुनेवर वर्चस्व गाजविण्याचा ती प्रयत्न करीत असते. 
 
लग्नानंतर सुनेवर नवीन जबाबदारी येऊन पडत असते. नवर्‍याबरोबच तिला घरातील इतर मंडळींची, येणार्‍याजाणार्‍याची काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत सासूने सुनेच्या प्रत्येक गोष्टीत चूक काढणे योग्य नव्हे. त्यामुळे मुलालाही कोण चूक कोर बरोबर याचा निर्णय घेणे शक्य होत नाही. म्हणूनच विवाहानंतर सासूने सुनेच्या व मुलाच्या पतीपत्नी यानात्यामध्ये हस्तक्षेप करू नये. नाहीतर जन्मभरासाठी बनलेले संबंध औटघकेचे ठरण्यास वेळ लागणार नाही. 
 
आईच्या अशा वर्तनाने मुलाच्याही मनात आईविषयी कटू भाव निर्मार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच सुनेला तिच्या जबाबदार्‍या स्वतंत्रपणे ‍पार पाडण्याची मोकळीक सासू नावाच्या आईने द्यायला हवी. त्यामुळे मुलाच्या मनात आईबद्दल कटूभाव आणि सुनेच्या मनात द्वेष निर्माण न होता एक निर्मळ नांत अधिक घट्ट होण्यास मदत होईल.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

तुम्हाला वारंवार सर्दी होते का? हे आयुर्वेदिक उपाय करून पहा!

Baby girl names inspired by Lord Rama प्रभू श्रीराम यांच्या नावावरुन मुलींची नावे

दसऱ्याच्या गोडधोडासाठी बनवा घट्ट आणि मलाईदार बासुंदी; घरच्या घरी मिळेल हलवाईसारखी चव

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर बाळासाठी निवडा प्रभू श्रीरामांची ही खास आणि युनिक नावे

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

पुढील लेख
Show comments