1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

बाजारात ख्रिसमसची धूम

WD
WD
देश-विदेशातील सर्व अर्थतज्ज्ञांचे अंदाज फोल ठरवत मागील आठवड्यात बाजाराने दणक्यात वाढ नोंदवत ख्रिसमसचा सण साजरा केला. बुधवारी आणि गुरुवारी बाजारात मागील 19 महिन्यात सर्वाधिक वाढ दिसून आली. आज ख्रिसमस असल्याने बाजार बंद असून, गुरुवारी बाजाराच्या शेवटच्या दिवशी बाजार फुलला होता.

गुरुवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 129.50 अंशांची वाढ झाल्याने बाजार 17,360.61 अंशांवर बंद झाला तर काल दिवसभरात बाजारात 539 अंशांची वाढ दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीत 33.80 अंशांची वाढ झाल्याने बाजार 5,178.40 अंशांवर बंद झाला.

अन्न-धान्याचा महागाई दर घसरल्याने आणि प्रमुख क्षेत्रातील विकास दर 5.3 टक्क्यांवर येण्याच्या सकारात्मक बातम्यांनी बाजाराला चांगलाच आधार दिला.