बाजारात चढ-उतार सुरूच राहणार
ख्रिसमसच्या सुट्टा आल्याने भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार फिरकण्याची कमीच शक्यता असून, यामुळे नवीन आठवड्यात भारतीय बाजारात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नोव्हेंबर महिन्यात महागाई दर वाढत 4.78 टक्क्यांवर गेल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक कडक निर्बंध लादण्याची भीती गुंतवणूकदारांना सतावत आहे. याचाच फटका नवीन आठवड्यात बाजाराला बसण्याची शक्यता आहे.
नुकत्याच संपलेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. आता ख्रिसमसच्या सुटट्या असल्याने बाजारात पुन्हा एकदा घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.