बाजारात दिवसभर चढ-उतार
युरोपीय बाजारांना सुरुवात होण्याची वाट पाहत ताटकळणाऱ्या मुंबई शेअर बाजारात आज चढ-उतारांचा खेळ दिसून आला. बाजारात सुरुवातीला घसरण दिसून आली, परंतु युरोपीय बाजारात चांगली सुरुवात दिसून आल्यानंतर भारतीय बाजारानेही सकारात्मक बदल करत दिशा बदलली.
बीएसईचा निर्देशांक 36 अंशांनी वाढत 16913 अंशांवर बंद झाला, तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 9 अंशांनी वधारत 5042 अंशांवर बंद झाला.
आयटी, फार्मा, ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज चांगली खरेदी दिसून आली. महिंद्रा, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एसबीआय, या कंपन्यांचे शेअर्स बाजार बंद होताना घसरले होते.