शेअर बाजाराचे 'टाइम टेबल' चेंज
मुंबई शेअर बाजाराचे वेळापत्रक आता बदलणार आहे. बाजाराने सेबीकडे केलेली मागणी सेबीने मान्य केली असून, बाजार आता सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
सेबीचे कार्यकारी संचालक जे एन गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार सेबीने बाजाराला नव्या वेळेत काम करण्याची परवानगी दिली आहे. वेळ बदलल्याने निर्माण होणाऱ्या परिस्थितीवरून तोडगा काढण्याच्या सूचना बाजाराला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.