1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

शेअर बाजारात घसरण

WD
WD
ख्रिसमस पूर्वी गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकिंगमुळे आज शेअर बाजारात घसरण दिसून आली आणि बाजार नकारात्मक दिशेने गेला. बाजारात बरेच चढ-उतारही आज दिसून आले.

बीएसईचा निर्देशांक119 अंशांनी घसरत 16601 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 35 अंशांनी घसरत 4953 अंशांवर बंद झाला. हिंडाल्गो इंडस्ट्रीज, महिंद्रा एंण्ड महिंद्रा, जे पी असोसिएटस, डीएलएफ आणि भारती एअरटेल या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

दुसरीकडे विप्रो, टीसीएस, एनटीपीसी, आरआयएल, आणि सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा