- वृत्त-जगत
» - अर्थजगत
» - शेअर बाजार
शेअर बाजारात तेजी
विदेशी बाजारात आलेल्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर आज घरगुती शेअर बाजारातही तेजी पहायला मिळाली असून साडे दहा वाजेच्या सुमारास सेंसेक्समध्ये 50 अंशांची तेजी येऊन निर्देशांक 15830 वर तर निफ्टी 12 अंशांच्या उसळीसह 4700 च्या पातळीवर होते. आठवड्याच्या सुरूवातीच्या दिवशीच बाजाराने मजबूत सुरूवात केली. तेव्हापासून बाजारात सातत्याने तेजी आहे. बाजार उघडला त्यावेळी सकाळी 9.55 वाजेच्या सुमारास सेंसेक्स 17 अंशांच्या घसरणीसह 15,763.09 वर उघडला मात्र नंतर काही सेकंदातच बाजार 31.09 अंशांची तेजी गाठली.