- वृत्त-जगत
» - अर्थजगत
» - शेअर बाजार
शेअर बाजारात तेजी
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुरुवातीपासूनच तेजी दिसून येत आहे. सकाळी निर्देशांकात 174 अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 59 अंशांनी वाढत 4900 अंशांवर गेला आहे. बाजारातील पहिल्या टॉप कंपन्यांमध्ये स्टरलाईट, टाटा स्टील, आणि जेपी असोसिएट यांचा समावेश आहे. मंगळवारी बाजारात चांगली वाढ दिसून आली. यानंतर आज बाजार उघडताचक्षणी यात वाढ झाली.आठवड्याच्या पहिल्या दिवशी घसरलेल्या मुंबई शेअर बाजारात मंगळवारी 240 अंशांची वाढ दिसून आली. राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीतही 83 अंशांची वाढ झाली होती. रियल्टी, बँकिंग, ऑटो, धातू या क्षेत्रातील शेअर्समध्ये आज जोरदार वाढ दिसून आली.निर्देशांक सुरुवातीला 16255.42 अंशांवर स्थिरावला होता. बाजार बंद होताना निर्देशांक 240.26 अंशांनी वाढत 16454.45 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय बाजाराचा निफ्टीही मंगळवारी 4808.35 अंशांवर स्थिरावत 83.50 अंशांनी वाढत 4892.10 अंशांवर बंद झाला.