मुंबई शेअर बाजाराच्या तेजीला आज अखेर ब्रेक लागला. बीएसईचा निर्देशांक 98 अंशांनी घसरत 17082 तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 24 अंशांनी घसरत 5078 अंशांवर बंद झाला.
गोदरेज, आयटीसी आणि नेस्लेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. मागील दोन दिवसांपासून बाजारात सातत्याने तेजी दिसत होती. मागील आठवड्यात तर बाजाराने 17 हजारांचा पल्ला तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीने 5 हजारांचा पल्ला गाठला होता.
आज बाजार सुरू झाल्यापासूनच यात घसरण दिसून येत होती. बाजार घसरतच सुरू झाल्याने बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि बाजार बंद होताना यात घसरण दिसून आली.