अरे संसार संसार......

Author स्नेहल प्रकाश| Last Modified गुरूवार, 21 मे 2020 (10:01 IST)
शेजारी एक सानिका-सुशील हे नवपरिणित दाम्पत्य रहायला आले. कुतुहल मिश्रित चौकशीतून कुठून आले कुठे काम करतात वगैरे कळले. एव्हाना मी त्यांची मावशी झाले होते. दोघेही सकाळीच घराबाहेर पडत. सानिका उत्साही व्यवस्थित मुलगी होती. ती क्वचित आमच्या घरी यायची तेव्हा माझ्यातली आजीबाई जागी व्हायची.
तुला स्वयंपाक येतो का ? विचारले असता

हो येतो ना थोडा थोडा..

सकाळी कं. लंच घेतो संध्याकाळी काय कधी वरण भात, कधी पोळी भाजी, कधी खिचडी असे मी 3 दिवस कधी सुशील 3 दिवस असे करतो. संडेला बाहेरचे काही मागवतो किंवा मॅगी वगैरे.

एकंदर फार छान चाललंय आमचं....

मला गंमत वाटली ऐकून. पण असं कसं ग ?

कितीतरी गोष्टी असतात घर म्हंटल की....
दूध दूभतं, कपडे, भांडी, बाया, प्रेसवाला, भाजी किराणा, घरातली आवर सावर, जाळे जळमटे, बाईकडून किंवा स्वतः सुटीच्या दिवशी करायची कामे....गॅस
सिलेन्डर....अनेक प्रकारची बीलं.... मी आपली अनुदिनी अनूतापे तापलो रामराया म्हणत संसाररूपी गाडा हाकत असताना हे लोक एवढ्या सहज सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतात ?

त्यावर तिचे उत्तर ठरलेले सगळी कामे आम्ही 50/50 करतो. जास्त घोळ घालत नाही. माझ्या मनातले काही प्रश्न मात्र अनुत्तरितच.....ह्यांना कधी गरम उपमा पोहे शिरा खावासाच वाटत नसेल का ? कपड्यांच्या पसारा कोण आवरत असेल...वगैरे अरसिक, अनरोमँटिक विचार यायचे थांबत नव्हते.
अशीच एकदा सुशीलशी गाठ पडली. उदास दिसला. विचारल्यावर हळूच म्हणाला मावशी आईची हल्ली फार आठवण येते. गुगल वर सगळ्या रेसिपीज मिळतात...विकतही पदार्थ मिळतात पण मला कंटाळा आलाय....

थालीपीठ, उकडपेंडी, शेवयाची खीर, शेवग्याच्या शेंगांची भाजी, चिंच गुळाचं वरण ह्या तेव्हाच्या नावडत्या गोष्टींची आता तीव्रतेने आठवण येते. दोघांचीही परिस्थिती साधारण सारखीच झाली होती....

हत्तीच्या एवढेच काय ? मी खाऊ घालेन की... मला श्रावणात आयतेच मेहुण घडेल.
दोघांनाही पुरणावरणाचे जेवू घातल्यावर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. मलाही समाधान होते. जाताना डबडबलेल्या डोळ्यांनी सानिका म्हणाली मलाही असे कधी करायला जमेल का हो मावशी....

तिला सांगितले अगं तुला असं वाटणं हेच तू संसारी होत असल्याचं द्योतक आहे.. आताचे फुलपाखराचे दिवस आहेत तुझे...हळूहळू आपोआप संसारी होत जाशील...मग आहेच 'खुर्ची का मिर्ची.....जाशील कैशी...
विनीत - स्नेहल खंडागळे


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

कब्ज आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्ची केळी आहे फायदेशीर

कब्ज आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्ची केळी आहे फायदेशीर
पिकलेले केळी तर आपण खातोच आणि आपल्याला हे माहीत आहे की हे किती फायदेशीर आहे, पण कच्च्या ...

Expert Advice : कोरोनाशी लढण्यासाठी व्हिटॅमिन सी, ई आणि बी ...

Expert Advice : कोरोनाशी लढण्यासाठी व्हिटॅमिन सी, ई आणि बी 6 किती गरजेच?
सध्या सम्पूर्ण देश कोरोनाने त्रस्त झाले आहे. या आजारापासून सुटका मिळविण्यासाठी सतत ...

ध्यान आणि आसन शिका या सोप्या पद्धतीने

ध्यान आणि आसन शिका या सोप्या पद्धतीने
आपण कधी योगाच्या अंतर्गत येणारे ध्यान आणि आसन केले नसतील तर येथे सादर आहे काही सोप्या ...

Skin Care : या वस्तू त्वचेसाठी हानिकारक, नक्की वाचा

Skin Care : या वस्तू त्वचेसाठी हानिकारक, नक्की वाचा
आपण आपले शरीर सुंदर दिसण्यासाठी खूप खर्च करत असला तरी दिवसभरातून आपण नकळत असे काही ...

संसर्गापासून बचाव करण्याव्यतिरिक्त अनेक आजारांवर फायदेशीर ...

संसर्गापासून बचाव करण्याव्यतिरिक्त अनेक आजारांवर फायदेशीर तुळशीचा काढा
युनानी औषधींच्या पद्धतीनुसार तुळशीमध्ये रोगांना बरे करण्याची क्षमता आहे. तुळस संसर्गाला ...