Marathi Biodata Maker

गाजराचा मुरंबा

शनिवार, 23 जानेवारी 2021 (14:55 IST)
साहित्य : सात ते आठ लाल गाजरे, गाजराच्या फोडीं इतकी साखर, वेलदोडे, दोन लिंबे, चुन्याची निवळी व तुरटी.
 
कृती : गाजरे सोलून त्यांचे तुकडे करावेत. नंतर ते तुकडे पाणी, चुन्याची निवळी व तुरटी यांच्या मिश्रणात एक दिवस बुडवून ठेवावेत. नंतर ते साध्या पाण्यात शिजवून घ्यावेत. नरम होईपर्यंत शिजवावेत. नंतर फडक्यावर दोन ते तीन तास पसरून ठेवावेत. 
 
नंतर एका भांड्यात साखर घालावी व त्यात साखर भिजेपर्यंत पाणी घालून साखरेचा पक्का पाक करावा. नंतर त्यात गाजराचे तुकडे घालून, पाक पुन्हा दाट होईपर्यंत शिजवावे. खाली उतरवून वेलदोड्यांची पूड घालावी व गार झाल्यावर लिंबाचा रस घालावा. हा मुरंबा साधारणपणे महिनाभर टिकतो.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

World Environment Day 2026 Essay in Marathi जागतिक पर्यावरण दिन निबंध मराठी

'चिझ-गार्लिक पराठा भन्नाट रेसिपी', अगदी हॉटेल स्टाईल चव घरीच

या 5 सुपरफूड्सचे सेवन करा, कॅन्सरचा धोका कमी करण्यास होईल मदत

Career After 10th: 10वीनंतरचे सर्वोत्तम कोर्सेस आणि करिअर पर्याय जाणून घ्या

त्वचेचा टोन वाढवायचा आहे? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

पुढील लेख
Show comments