सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Updated : मंगळवार, 12 जानेवारी 2021 (17:31 IST)

मकर संक्रांतीच्या आदल्या का साजरी करतात भोगी

‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा!. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी काय करतात हे आपण सविस्तर जाणून घेऊ या-
 
का साजरी करतात भोगी 
भोगीच्या दिवशी इंद्र देवाची आठवण काढत त्यांना आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली जाते. काही राज्यांमध्ये या दिवशी होळी पेटवून त्यात काही खाद्य वस्तूंची आहुती दिली जाते. 
 
विशेष पदार्थ
भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते. याला भोगीची भाजी म्हणतात. ही भाजी खूपच पौष्टिक असते. या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, गुळाची पोळी, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात.
हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं.