सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (10:08 IST)

गुरुचा आदर करावा, लक्ष्मी आणि सरस्वतीची कृपा मिळत राहील

चाणक्य हे स्वतः योग्य शिक्षक होते. ते जगातील प्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठाचे शिक्षक होते. आपल्या जीवनात गुरुची विशेष भूमिका असते. गुरूच्या विना आयुष्यात यश प्राप्त करणं कठीणच असतं. गुरु आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या मिश्रणाने अंधार दूर करण्यात सहाय्यक असतो. म्हणून गुरुचे आदर करणे सर्वोपरी आहेत. 
 
चाणक्याच्या मते, जी व्यक्ती गुरुचा सन्मान करते, वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेते त्यांना आई लक्ष्मी आणि आई सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. 

लक्ष्मी ही धनाची देवी आहे आणि सरस्वती ज्ञानाची देवी आहे. लक्ष्मी देखील त्यांच्याकडेच असते ज्यांना सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो. कारण धनाचा योग्य वापर सरस्वती शिवाय शक्य नाही. या दोन्ही देवींना प्रसन्न करण्यासाठीचा मार्ग गुरूच्या शिकवणीत असतो. म्हणून गुरुसाठी नेहमी मनात आदर असावा.
 
गुरूचा सन्मान करा -
जो माणूस गुरूचा नेहमी आदर करतो त्यांना देवांचा आशीर्वाद देखील मिळतो. संकटाच्या काळात असे लोक आपला संयम सोडत नाही. गुरूचा आदर करणाऱ्यांना नेहमीच सर्वत्र आदर मिळतो. 
 
* गुरुची शिकवण आयुष्यात समाविष्ट करा- 
गुरुने दिलेली शिकवण कधीही वाया जात नसते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गुरुने दिलेली शिकवणच कामी येते. म्हणून गुरूच्या गोष्टींना गांभीर्याने आणि काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. कारण गुरूच्या शब्दात आयुष्याच्या यशाचे रहस्य दडलेले आहे.
 
* गुरुने सांगितलेल्या मार्गावर चाला- 
गुरु कधीही चुकीचा सल्ला देत नसतात. गुरु नेहमी सत्याचा मार्ग दाखवतात. हा मार्ग कठीण होऊ शकतो पण या मार्गाचा अवलंब केल्याने जीवनातील सर्व त्रास दूर होतात कारण केवळ गुरूच्या बोलण्यानेच जीवनाला यशस्वी केले जाऊ शकतं. गुरु माणसाला गोंधळलेल्या स्थिती मधून काढतो आणि त्याला त्याचा क्षमतेची जाणीव करून देतो आणि आपल्या लक्ष साध्य करण्यासाठी प्रवृत्त करतो.