कार्तिकी एकादशीस, तुझ्यात रंगून जाणं
पंढरीच्या विठुरायाच्या पायी मागते मागणं,
कार्तिकी एकादशी स, तुझ्यात रंगून जाणं,
अवघा रंग व्हावा विठू माझा, हेची ठावे,
आणि काय उरले बरें, काय म्या मागावे?
करू सेवा देवा तुझी ही,मनोभावे तुज स्मरून,
तूच उरावा शेवटास, जेव्हा प्राण जाईल उडून,
आंनदी आंनद आज, काहीच मजसी सुचेना!
नामसमरण तुझंच सावळ्या, नित मी करेन,
वारी घडे न घडे माझ्या करवे, खंत ही मनी,
पायी दे आसरा सकला, हीच प्रार्थना या क्षणी!
...अश्विनी थत्ते