चॉकलेट डे 2024 : पार्टनरसाठी बनवा कुकीज जाणून घ्या रेसिपी
वेलेंटाइन डे चा दिवस खास असतो. या दिवशी काहीजण आपल्या पार्टनरला ते तुमच्यासाठी किती खास आहेत याची जाणीव करून देण्यासाठी खूप काही करतात अनेक लोक आपल्या पार्टनरला डेट वर घेउन जातात आणि त्यांच्या सोबत वेळ घालवतात यासोबतच बरेच लोक आपल्या पार्टनरला स्वताच्या हाताने एखादा पदार्थ बनवून खाऊ घालतात.
वेलेंटाइन विकच्या तिसऱ्या दिवशी 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना चॉकलेट्स देतात. कारण त्यांच्या प्रेमात चॉकलेटस सारखा गोडवा रहावा. तुम्ही चॉकलेट्स डे ला खास बनवू इच्छित आहत का तर तुमच्या पार्टनरसाठी चॉकलेट्स कुकीज तयार करु शकतात. कसे बनवायचे चॉकलेट्स कुकीज रेसिपी जाणून घ्या .
साहित्य
1 कप मैदा
1/2 कप बटर
1/2 कप साखर
1/4 कप कोको पावडर
1/4 छोटा चमचा वैनिला एसेंस
1/4 कप दूध
कृती
घरी चॉकलेट्स कुकीज बनवण्यासाठी सगळ्यात आधी बटरला एक मोठया भांडयात वितळवून घ्या यानंतर सखरेला त्यात टाका आणि चांगल्या प्रमाणात मिक्स करा. म्हणजे ते चांगले मिक्स होतील. आता यात व्हानीला एसेंस टाका आणि हे मिश्रण हलवा. त्यानंतर यात मैदा, कोको पावडर टाका व चांगले मिक्स करून त्यात थोडे थोडे दूध टाका दूध चांगल्या प्रकारे मिक्स झाले की त्याला पीठाच्या गोळ्याप्रमाणे बनुन घ्या लक्षात ठेवा की हा गोळा जास्त पाताळ आणि जास्त घट्ट बनायला नको हे मिश्रण तयार झाल्यानंतर याचे गोळे बनवून त्याला तुमच्या मनाप्रमाणे आकार दया. मग या बनवलेल्या कुकीजला मायक्रोओव्हन ट्रे वर बेकिंग पेपर टाकून त्यावर ठेवा. त्यानंतर प्रीहीट केलेल्या ओवन मध्ये 180 डिग्री सेल्सियस वर यांना 12-15 मिनिटसाठी बेक करा बेक झाल्यावर कुकीजला थंड होऊ दया मग स्टोर करून ठेवा.