Biodata Maker marathi
✕

Holi Special ओठावर ठेवताच विरघळणारी रसाळ पाकातील करंजी

Updated: सोमवार, 2 मार्च 2026 (12:12 IST)
सुकं खोबरं: १/२ वाटी (किसून हलकं भाजलेलं)
पिठीसाखर: १/२ वाटी
वेलची-जायफळ पूड: १ चमचा
ड्राय फ्रूट्स काप: आवडीनुसार (काजू, बदाम, पिस्ता)
 
पाकासाठी :
साखर: १.५ वाटी
पाणी: १ वाटी
केसरच्या काड्या: ७-८
 
कृती 
१. पीठ भिजवणे: मैद्यात मीठ आणि कडकडीत तुपाचे मोहन घालून हाताने चोळून घ्या. थोडे थोडे दूध/पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. १ तास झाकून ठेवा.
२. सारण तयार करणे: एका कढईत खवा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. खवा पूर्ण थंड झाल्यावर त्यात किसलेले खोबरे, पिठीसाखर, वेलची पूड आणि ड्राय फ्रूट्स घालून एकत्र करा.
३. पाक तयार करणे: साखर आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवा. आपल्याला एकतारी पाक हवा आहे. पाक चिकट झाला की त्यात केसर आणि वेलची पूड टाकून गॅस बंद करा.
४. करंज्या वळणे: पिठाच्या छोट्या लाट्या करून पातळ पुरी लाटा. मध्यभागी सारण भरा. कडेला थोडे दूध लावून करंजी नीट बंद करा आणि कातण्याने किंवा साच्याने आकार द्या.
५. तळणे: कढईत तूप किंवा तेल मध्यम गरम करा. करंज्या मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
६. पाकात घोळवणे: तळलेली गरम करंजी कोमट पाकात टाका. साधारण २-३ मिनिटे पाकात राहू द्या, जेणेकरून ती पाक व्यवस्थित शोषून घेईल. त्यानंतर एका जाळीवर काढून ठेवा.
 
काही खास टिप्स :
खुसखुशीतपणासाठी: पीठ मळताना साजूक तुपाचे कडकडीत मोहनच वापरा.
पाकाचे तापमान: करंजी गरम आणि पाक कोमट असावा. जर पाक थंड झाला असेल, तर करंजी पाक शोषणार नाही.
सजावट: पाकातून काढल्यानंतर त्यावर सुक्या मेव्याचे काप किंवा चांदीचा वर्ख लावून तुम्ही तिला अधिक आकर्षक बनवू शकता.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रभावी व्यक्तिमत्त्व निबंध

हिवाळ्यात गाजरापासून बनवता येणाऱ्या अतिशय पौष्टिक रेसिपी Healthy Carrot Recipes

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचा इतिहास अणि महत्त्व जाणून घ्या

हृदयाचे आरोग्य जपायचे आहे? रोजच्या जीवनात करा हे महत्त्वाचे बदल

जपानी, जर्मन आणि फ्रेंच यांसारख्या भाषा शिकल्यास, तुम्हाला करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात

पुढील लेख
Show comments