शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : रविवार, 19 ऑक्टोबर 2025 (23:24 IST)

नरक चतुर्दशीला कोणत्या पदार्थांचे नैवेद्य दाखवावेत? सोपी रेसिपी देखील वाचा

Narak Chaturdashi recipe
नरक चतुर्दशीला नैवेद्य म्हणून सात्विक आणि पवित्र पदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्ण, यमराज आणि हनुमानजी यांची पूजा केली जाते, त्यामुळे नैवेद्यामध्ये प्रामुख्याने गोड पदार्थ, तीळ आणि तेलापासून बनवलेले पदार्थ आणि सात्विक अन्न यांचा समावेश असतो.  
 
नरक चतुर्दशीला नैवेद्य काय दाखवावा? 
करंजी- 
साहित्य-
एक कप मैदा 
आवश्यकतेनुसार दूध
अर्धा कप खोबर्‍याचा क‍िस 
१/४ कप पिठी साखर 
काजू 
किस‍मिस
बदाम
एक चमचा खसखस 
चारोळ्या
वेलची पूड 
जायफळ पूड 
तळण्यासाठी शुद्ध तूप 
 
कृती- 
सर्वात आधी मैदा बारीक चाळणीने चाळून घ्यावा. नांतर त्यामध्ये मोहन घालावे व दुध घालून मळून घावे. आता हा मळलेला गोळा बाजूला ठेऊन द्यावा. आता पण आतील सारणची तयारी करूया. आतील सारणासाठी खोबर्‍याच्या किसात पिठी साखर घालावी. त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे, खसखस, चारोळ्या, वेलची पूड, जायफळ पूड घालावी. व सर्व मिश्रण एकजीव करावे. भ‍िजविलेल्या मैद्याचे छोटे गोळे तयार करून प्रत्येक गोळ्याला गोल आकारात लाटून घ्या. त्यात वरील सारण भरून करंजीचा आकार द्या. तसेच एका कढईत तूप गरम करून करंज्या मंद आचेवर खरपूस तळून घ्या. चला तर तयार आहे आपल्या दिवाळी फराळ स्पेशल करंजी. 
 
दही पोहे-
साहित्य-
जाडे पोहे एक वाटी
दही-अर्धा वाटी
मीठ 
साखर-एक चमचा  
कोथिंबीर 
 
कृती-
सर्वात आधी पोहे स्वच्छ धुऊन 5 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. नंतर पाणी काढून टाकून पोहे निथळून घ्या.एका भांड्यात पोहे, दही, मीठ आणि साखर मिसळा. वरून कोथिंबीर पेरून नैवेद्य दाखवावा.
 
तिळाच्या वडया-
साहित्य:
अर्धा कप- भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
अर्धा कप- किसून भाजलेले सुके खोबरे
अर्धा कप- तिळ
पाऊण कप- किसलेला गूळ
अर्धा टेस्पून- तूप
अर्धा टिस्पून- वेलचीपूड
सुकामेवा
 
कृती-
सर्वात आधी तीळ गुलाबी रंगाचे होईपर्यंत खमंग भाजून घ्यावे. त्यातले अर्धे तीळ मिक्सर मध्ये भरड वाटून घ्यावे. पोळपाटाला तूप लावून ग्रीस करुन घ्यावे. एका कढईत गूळ घालून बारीक गॅसवर विरघळून घ्यावे.गुळात भाजून वाटलेले तीळ, भाजलेले तीळ, दाण्याचे कूट, तूप, दूध, व वेलदोड्याची पूड घालावी. सर्व मिसळून गोळा तयार करावा. तूप लावलेल्या पोळपाटावर वरील मिश्रणाचा गोळा ठेऊन तूप लावलेल्या लाटण्याने अंदाजे अर्धा से. मी. जाड लाटून घ्यावं. वरून खोबरे पसरा व परत एकदा लाटणे फिरवावं. आवडीच्या आकाराचे काप करून घ्यावे.
 
तिळाचे लाडू 
साहित्य-
तीळ -एक वाटी
गूळ -३/४  वाटी  
तूप -एक चमचा
वेलची पूड- १/४ चमचा  
 
कृती-
सर्वात आधी तीळ स्वच्छ धुऊन कोरड्या तव्यावर मंद आचेवर खमंग भाजून घ्या. थंड होऊ द्या.एका कढईत तूप गरम करून गूळ वितळवून घ्या. गूळ पूर्णपणे वितळल्यावर गॅस बंद करा.वितळलेल्या गुळात भाजलेले तीळ आणि वेलची पूड मिसळा.
मिश्रण हलके थंड झाल्यावर हाताने लहान लहान लाडू वळा. लाडू थंड झाल्यावर देवाला अर्पण करा.
 
बेसन लाडू
साहित्य-
बेसन- दोन  कप
तूप -  एक कप
पिठीसाखर - एक  कप  
वेलची पावडर - अर्धा चमचा
काजू, बदाम  
मनुका  
 
कृती-
सर्वात आधी एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा. त्यात बेसन घालून मंद आचेवर सतत ढवळत भाजा. बेसनाचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत भाजा. बेसन भाजल्यानंतर कढई गॅसवरून खाली उतरवा आणि त्यात पिठीसाखर मिसळा. नीट ढवळा. चिरलेले काजू, बदाम आणि मनुका घाला. वेलची पावडर मिसळा. मिश्रण थंड झाल्यावर हाताने छोटे-छोटे लाडू वळा. जर मिश्रण कोरडे वाटले तर थोडे तूप घालून मळा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik