मंगळवार, 4 मार्च 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

बर्फीचे हे दोन प्रकार होळीला नक्की बनवा

Fig barfi
अंजीर बर्फी रेसिपी
साहित्य-
अंजीर -१७५ ग्रॅम
खजूर - ७५ ग्रॅम  
मनुका - ५० ग्रॅम  
पिस्ता चिरलेला - ५० ग्रॅम
काजू -  ५० ग्रॅम
बदाम -  ५० ग्रॅम
तूप - चार टीस्पून

कृती-
सर्वात आधी मिक्सरमध्ये अंजीर, खजूर आणि मनुका बारीक करून पेस्ट बनवा. आता पॅनमध्ये तूप घाला आणि काजू, बदाम आणि पिस्ता सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. आता सुकामेवा काढा आणि अंजीर पेस्ट परतवून घ्या.  नंतर सुकामेवा मिक्स आणि पाच मिनिटे भाजून घ्या. आता गॅस बंद करून आणि ट्रेवर तूप लावा आणि बर्फी सेट करा व नंतर इच्छित आकारात कापून घ्या. तर चला तयार हे आपली अंजीर बर्फी रेसिपी.

Chocolate barfi चॉकलेट बर्फी रेसिपी
साहित्य-
मावा - दोन कप
साखर - तीन चमचे
गुलाब पाणी - एक टीस्पून
वेलची पूड - एक टीस्पून
कोको पावडर - दोन चमचे
चिरलेले बदाम - दोन चमचे
कृती-
सर्वात आधी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात मावा भाजून घ्यावा, माव्यामध्ये साखर, वेलची पूड आणि गुलाबजल घाला, मिक्स करा आणि आणखी काही वेळ शिजवा. मावा व्यवस्थित शिजला की, एका ट्रेवर तूप लावा आणि त्यावर अर्धा मावा पसरवा. उरलेल्या अर्ध्या माव्याच्या मिश्रणात कोको पावडर मिसळा आणि ट्रेमध्ये पसरलेल्या माव्यावर चांगले पसरवा आणि ते सेट होऊ द्या. ट्रे २ तास फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर इच्छित आकारात कापून घ्या. तर चला तयार आहे आपली चॉकलेट बर्फी रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik