Marathi Biodata Maker
✕

सणासुदीला बनवा खमंग पुरणपोळी! जाणून घ्या साहित्य आणि सोपी कृती

Updated: मंगळवार, 11 ऑगस्ट 2026 (14:18 IST)
साहित्य
चणा डाळ: १ वाटी (२ तास भिजवलेली)
गूळ: १ वाटी (किसलेला)
गव्हाचे पीठ: १ कप
मैदा: १ कप (किंवा पूर्ण गव्हाचे पीठही वापरू शकता)
वेलची व जायफळ पूड: अर्धा चमचा
चिमूटभर मीठ, हळद
तेल: आवश्यकतेनुसार
तूप: पोळी भाजण्यासाठी

कृती
१. पुरण तयार करण्याची पद्धत:
चणा डाळ स्वच्छ धुवून १ ते २ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये ३ कप पाणी आणि चिमूटभर हळद घालून ४-५ शिट्ट्या काढून डाळ मऊ शिजवून घ्या. डाळ शिजल्यावर गाळणीने सर्व पाणी (कट) वेगळे काढून घ्या. (या पाण्याचा वापर तुम्ही झणझणीत कट्याची आमटी बनवण्यासाठी करू शकता). शिजलेली डाळ एका कढईत काढून त्यात १ कप चिरलेला गुळ घाला. मंद आचेवर हे मिश्रण सतत ढवळत राहा. गुळ वितळल्यावर मिश्रण थोडे पातळ होईल, पण सतत ढवळत राहिल्याने ते घट्ट होईल. चमचा पुरणात सरळ उभा राहिला की पुरण तयार झाले असे समजावे. शेवटी वेलची आणि जायफळ घाला. गरम असतानाच हे मिश्रण पुरण यंत्रातून किंवा गाळणीतून फिरवून घ्या. त्यामुळे पुरण एकदम मऊ होते.

२. कणिक भिजवण्याची पद्धत:
एका परातीत गव्हाचे पीठ, मैदा, चिमूटभर मीठ एकत्र करा.
थोडे थोडे पाणी घालून मऊ कणिक मळून घ्या.
कणिक मळल्यानंतर त्यावर २ ते ३ चमचे तेल घालून पुन्हा ४-५ मिनिटे नीट मळून घ्या (कणिक जेवढी मऊ आणि तेलकट असेल, पुरणपोळी तेवढीच छान मऊ होते). ही कणिक ३० मिनिटे झाकून ठेवा.

३. पुरणपोळी लाटणे आणि भाजणे:
मळलेल्या कणकेचा एक लहान गोळा घ्या. त्याची वाटीसारखी घडी करा किंवा छोटी पोळी लाटा.
कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा पुरणाचा गोळा त्या वाटीत ठेवा आणि सर्व बाजूंनी तोंड बंद करून जास्तीची कणिक काढून टाका.गोळा सुक्या पिठात (किंवा मैद्यात) घोळवून हलक्या हाताने कडेकडून पातळ लाटून घ्या. गरम तव्यावर पोळी टाका. एका बाजूने छोटे फुगे आले की पोळी उलटा. दोन्ही बाजूंनी छान शेकल्यावर साजूक तूप लावा. पोळी मस्त टम्म फुगेल!
ALSO READ: अचानक गोड खायची खायची इच्छा झाल्यास बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी
खमंग आणि मऊ पोळीसाठी खास टिप्स
मऊ कणिक: कणिक जेवढी सैलसर आणि मऊ असेल, पुरणपोळी लाटताना पुरण बाहेर येत नाही.
पुरणाची सुसंगतता: पुरण जास्त पातळ किंवा खूप सुके नसावे. मऊ पुरणामुळे पोळी शेवटापर्यंत छान भरलेली राहते.परतणे: पोळी तव्यावर वारंवार उलटू नका, फक्त दोन-तीन वेळा उलटून तूप लावून शेका म्हणजे ती कडक होणार नाही.गरमागरम पुरणपोळीवर साजूक तुपाची धार, गरम दूध किंवा कटाच्या आमटीसोबत सर्व्ह करा!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Jivati Puja Naivedya जिवती पूजनाच्या नैवेद्यात काय असावे?, मुख्य पदार्थ नक्की जाणून घ्या

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments