शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : बुधवार, 30 ऑगस्ट 2023 (07:39 IST)

Raksha bandan special Moong Dal Laddu Recipe :या रक्षाबंधनाला बनवा मूग डाळीचे पौष्टिक लाडू

रक्षाबंधन 2023: भारतात सणांना खूप महत्त्व आहे, राखीचा सण जवळ आला आहे,आपण बेसन, आटा, रवा, मखान्याचे लाडू नेहमी बनवतो पण यंदाच्या राखीच्या सणासाठी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक मिठाईची रेसिपी सांगत आहो. या राखीच्यासणा साठी आपण मूग डाळीपासून पौष्टिक लाडू कसे बनवायचे हे जाणून घेऊ या. चला साहित्य आणि कृती जाणून घ्या.

साहित्य- 
1 वाटी मूग डाळ
1/4 कप पिठीसाखर
1/4 वाटी साजूक तूप
सुका मेवा बारीक चिरून.
 
कृती- 
एका कढईत मूग डाळ टाकून मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजून झाल्यावर गॅस बंद करून थंड होऊ द्या.भाजलेली डाळ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या.

आता कढईत साजूक तूप टाकून डाळीची पूड घाला आणि सतत ढवळत राहा.10 मिनिटे शिजवा.  मिश्रण कढईतून वेगळे झाल्यावर काढून थंड होऊ द्या. त्यात साखर घाला बारीक चिरलेले सुकेमेवे घाला. आणि मिसळा. आता हे मिश्रण चांगले मळून घ्या आणि लहान लहान गोळे काढून लाडवाचा आकार द्या. मूगडाळीचे पौष्टीक आणि चविष्ट लाडू खाण्यासाठी तयार. 
 


Edited by - Priya Dixit