ऊसाच्या रसातील पोळी
|
कृती : एका भांड्यात कणीक घेऊन तुपाचे कोमट मोहन घाला, चिमटीभर मीठ घाला. ऊसाच्या रसामध्ये गूळ विरघळून घ्या. त्यातच विलायची पूड घाला व कणकेमध्ये थोडे थोडे घालत कणीक मळून घ्या. पंधरावीस मिनिटे भिजू द्या. करताना थोड्या तुपाचा हात घेऊन लाट्या करा व घडीच्या पोळ्या करून गरम तव्यावर तूप लावून भाजून घ्या. ह्या पोळ्या नवीन चव असल्यामुळे मुलांबरोबर वृद्धांना खूप आवडते.
