साहित्य : 1 कप चमचे साखर, 2 कप पाणी, 2 कप दूध, 3 अंडी, 1/2 छोटा चमचा वॅनिला इसेन्स.
कॅरॅमल बनविण्यासाठी : लहान जड सॉसपॅनमध्ये 1/2 कप साखर आणि 1 कप पाणी मिसळा. साखर विरघळेपर्यंत ढवळून उकळी येऊ द्या. पाक मध्यम आचेवरसतत ढवळत चांगला सोनेरी रंग येईपर्यंत उकळवा. पॅन आचेवरून काढा. कॅरॅमल 1 लीटर साच्यात ओता. तळाला आणि बाजूंना व्यवस्थित लागावा म्हणून साचा गोल गोल फिरवा.
दूध उकळवा आणि कोमट करून घ्या अंडी घुसळा आणि वॅनिला इसेन्स व उरलेली साखर यांच्यात मिसळा. दूध घालून मिसळा. साखर विरघळेपर्यंत चांगले ढळवा. हे मिश्रण कॅरॅमलचा थर असलेल्या साच्यात ओता. साचा ऍल्यूमिनियम फॉइलने घट्ट बंद करा. उरलेले पाणी कुकरामध्ये घ्या. कुकरामध्ये जाळी ठेवा. साचा जाळीवर ठेवा. कुकर बंद करून 10 मिनिटे शिजवा. नंतर कुकर उघडून साचा काढा आणि उघडा. सर्वसाधारण तापमानापर्यंत थंड करा. वाढायच्या वेळेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा. डिश साच्यावर उलट ठेवून साचा उलट करा. निघण्यासाठी हळूच हालवा. साचा काढा. थंडगार कस्टर्ड वाढा.