साहित्य- सहा कैर्या, दोनशे ग्रॅम साखर, विलायची, तुप, पूर्वतयारी- कैर्या गरम पाण्यात उकळून घ्याव्या, उकडलेल्या कैर्यांची साल काढून गर पातेल्यात काढावा.
कृती- गॅसवर पातेले ठेवून त्यात तुप टाकावे. तुप गरम झाल्यावर कैर्यांचा गर पातेल्याच ओतावा. गरात साखर घालावी. बारीक केलेली विलायची घालावी. गर जास्त घट्ट वाटल्यास आवश्यकते प्रमाणे त्यात पाणी घालावे. उकळी येईपर्यत मंद आचेवर गरम करावे. उन्हाळ्यात शरीरास पोषक पन्हे तयार.