बुधवार, 21 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

गुलाब जामून

गुलाबजाम तयार करण्याची पाककृती
ND
साहित्य- अर्धा किलो खवा, दोनशे ग्रॅम मैदा, अर्धा किलो वनस्पती तूप, पावभर दूध, साखर अर्धा किलो, विलायची दहा ग्रॅम, बादाम व काजू शंभर ग्रॅम, खायचा सोडा.

पूर्वतयारी- बादाम व काजू मिक्सर मधून काढावे, खवा, मैदा, बादाम, काजू पावडर व खायचा सोडा एकत्र मिसळायचा दूध मिसळून मिश्रण चांगले एकजीव करायचे.

कृती- पातेल्यात साखर घालून आवश्यक तेवढे पाणी घालावे व गुलाब जामून टाकण्यासाठी चाचणी करायची. मंद आचेवर साखरेचा पाक घट्ट येणार नाही याची काळजी घ्यावी. गुलाब जामूनची चाचणी हलकी व पातळ असते. खव्याचे तयार मिश्रणाचे छोटे गोलाकार गोळे करायचे. गॅसवर कढई ठेवून वनस्पती तूप घालायचे. तळण्याजोगे तापल्यानंतर तयार केलेले जामून तांबडा रंग येईपर्यत तळायचे.

पूर्ण फ्राय झालेले गुलाबजामून तयार केलेल्या चाचणीत टाकायचे. एक तास साखरेच्या पाकात किवा चाचणीत जामून मुरायला ठेवल्यानंतर फ्रिज मध्ये थंड करायला ठेवायचे. अशाप्रकारे स्वादिष्ट गुलाब जामून तयार.