बुधवार, 21 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

जिलबी

मैदा
साहित्य : 1/2 किलो मैदा, 1/2 वाटी दही, दोन चमचे तेल, केशर किंवा खाण्याचा केशरी रंग, अर्धी वाटी चण्याच्या डाळीचे पीठ, पाऊण किलो साखर, लिंबू, तळण्यासाठी तूप.

कृती : ज्या दिवशी जिलबी करायची असेल त्याच्या अदल्या दिवशी
WD
रात्री मैदा, दही, तेल व कोमट पाणी हे सर्व मिसळून, भिजवून ठेवावे. दुसर्‍या दिवशी जिलबी करावयाच्या वेळी अर्धी वाटी डाळीचे पीठ घालून ते मिश्रण चांगले फेसावे. साखरेचा दोन तारी पाक करावा. त्यात केशर किंवा केशरी रंग घालनू व लिंबू पिळून पाक करावा.


एका जाड फडक्याला हरभर्‍याच्या डाळीऐवढे भोक पाडून ते बटणाच्या काज्याप्रमाणे शिवून घ्यावे. फडक्यात पीठ घालनू तापलेल्या तुपात त्याची गोल जिलबी पाडावी तळून झाल्यावर गरम असतानाच पाकात सोडावी. दुसर्‍या जिलब्या तळून होईपर्यंत पहिल्या जिलब्या पाकात ठेवाव्या.