1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

टोमॅटोच्या वड्या

WD
साहित्य : दोन चांगले पिकलेले मोठे टोमॅटो, एक नारळ, पाव किलो साखर, अर्धी वाटी दळलेली साखर, पिस्ते.

कृती : टोमॅटो शिजवून, गाळून घ्यावेत. टोमॅटोचा गाळलेला रस, साखर व नारळाचे खोवलले खोबरे हे सर्व एकत्र शिजावयास ठेवावे. गोळा
होत आल्यावर खाली उतरवून चांगले घोटावे. गोळे मऊ वाटलाच, तर दळलेली साखर घालून पुन्हा चांगले घोटावे. नंतर ताटाला तूप लावून
तो गोळा थापावा. त्यावर पिस्त्याचे काप घालावेत व वड्या कापाव्यात. ह्या वड्यांना रंग छान येतो व त्यामुळे त्या आकर्षक दिसतात.