साहित्य : एक मोठा पॅकेट ब्रेड, एक आंबा, एक वाटी साय, एक वाटी पिठी साखर, एक चमचा गुलाब जल, सजावटीसाठी काजू, किशमिश, बदाम, जॅम आवश्यकतेनुसार.
कृती : सर्वप्रथम सायीत अर्धा वाटी साखर व गुलाब जल घालून चांगल्याप्रकारे फेटून घ्यावे. बाकी उरलेली साखर आंब्यात घालून मिश्रणाला फेटून घ्यावे. आता एखाद्या प्लेटमध्ये एक ब्रेड ठेवावी, त्यावर आंब्याचे मिश्रण पसरवावे, त्यावर दुसरी ब्रेड ठेवून सायीचे मिश्रण पसरवावे. आता त्यावर तिसरी ब्रेड ठेवून जॅम लावावे.
त्यानंतर चौथी ब्रेड ठेवून सायीचे मिश्रण लावावे. नंतर सजावटीसाठी काजू, किशमिश इत्यादी लावावे व याला केक प्रमाणे मधून दोन भागात कापावे. आता हा तीन रंगात दिसेल. पाहुण्यांसाठी चविष्ट तिरंगा केक तयार आहे.