1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

पिस्ता बर्फी

पिस्ता बर्फी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : 250 ग्रॅम पिस्ते, 150 ग्रॅम साखर, 1 थेंब गुलाब इसेन्स.

कृती : पिस्त्याला कपड्यात बांधून उकळत्या पाण्यात 5 मिनिट ठेवून काढून घ्यावे. स्वच्छ कपड्यावर पसरवून त्याची सालं काढून घ्यावे.
सालं काढून झाल्यावर त्याला मिक्सरमधून जाडसर काढून घ्यावे. साखरेचा पाक तयार करून घ्यावा. त्यात वाटलेल्या पिस्त्याची पूड घालून एकजीव करावे. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण टाकून वड्या पाडाव्यात.