बटाट्याच्या वड्या
|
कृती : बटाटे उकडून, ते पुरण वाटावयाच्या यंत्रातून वाटून घ्यावेत. याप्रमाणे वाटलेला गोळा दोन वाट्या, साखर तीन वाट्या, अर्ध्या नारळाचे खोवलेले खोबरे असे सर्व एकत्र करून शिजत ठेवावे. घट्ट गोळा होईपर्यंत शिजवावे व नंतर खाली उतरवून चांगले घोटावे. वेलदोड्यांची पूड घालावी. पोळपाटास तुपाता हात लावून, त्यावर लाटून वड्या कापाव्यात.
