1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

मक्याचे केशरी लाडू

मक्याचे केशरी लाडू
ND
लागणारे जिन्नस :
400 ग्रॅम मक्याचे दाणे, 350 ग्रॅम दळलेली साखर, 100 ग्रॅम मावा, एक कप दूध, 50 ग्रॅम खोबर्‍याचा कीस, 5 हिरवी वेलची, मनुके, बदाम, काजू, केशर 8-10 पत्ती, 200 ग्रॅम तूप.

तयार करावयाची कृती :
प्रथम दुधात केशर भिजवून घोटून घ्या. काजू, बदाम किसून घ्या. वेलचीची पूड करून घ्या. मक्याचे दाणे दुधात टाकून मिक्सरमधून पेस्ट करून घ्या.

कढईत तूप टाकून तयार केलेली पेस्ट टाका आणि कमी आचेवर बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्या. भाजल्यावर तूप सुटायला लागते. या पेस्टमध्ये केशर टाकून तयार केलेले दूध टाका. दुसर्‍या कढईत मावा टाकून भाजा.

नंतर मकईचे मिश्रण, भाजलेला मावा, दळलेली साखर व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यात खोबर्‍याचा कीस, वेलची पूड, काजू, बदाम, मनुके टाकून व्यवस्थित मिक्स करा. या मिश्रणाचे लहान-लहान गोळे घेऊन लाडूचा आकार द्या. आता केशरयुक्त मक्याचे लाडू खाण्यास तयार आहेत.