1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड

रंगीबेरंगी आइसक्रीम

ND
साहित्य : 2 लीटर दूध, 1/2 साखर, 4 मोठे चमचे कस्टर्ड पावडर, 2 मोठे चमचे कोको पावडर, 2 कप गाजर रस.

कृती : एका भांड्यात दुधाला उकळत ठेवावे. त्यात साखर टाकून 10 मिनिट अजून उकळावे. नंतर दुधाला खाली उतरवून 3 भागात वेग वेगळे करावे. पहिल्या भागात कस्टर्ड पावडर मिसळून फ्रीजमध्ये ठेवावे. अर्धा तासानंतर ते थोडं जमण्यात येईल तेव्हा, दुसऱ्या भागात गाजराचा रस मिसळून ते मिश्रण कस्टर्डच्या वर घालून परत जमण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. अर्धा तासानंतर ते मिश्रण बाहेर काढून ठेवावे, उरलेल्या भागात कोको पावडर टाकून ते मिश्रणावर टाकावे आणि सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. जेव्हा आइसक्रीम पूर्णपणे जमेल तेव्हा बाहेर काढून त्याचे चौकोनी काप करून रंगीबेरंगी आइसक्रीम सर्व्ह करावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा