शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

रसदार केसरी वडे

ND
साहित्य : 1 कप उडीद डाळीचे पीठ, 2 कप साखर, 2-3 थेंब वेलची इसेंस, 8-10 काड्या केशर, तळण्यासाठी तूप, काप केलेले पिस्ते.

कृती : उडदाचे पीठ चार-पाच तास भिजत ठेवावे. नंतर त्यात केशर घालून चांगले फेटून घ्यावे. गरज असल्यास थोडे दूध घालावे. साखरेचा एकतारी पाक करून त्यात केशर, वेलची इसेंस टाकावा. कढईत तूप गरम करून त्यात पिठाचे वडे तयार करून तळून घ्यावे व पाकात काही वेळ ठेवून गरम गरम सर्व्ह करावे.