बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. शिक्षक दिन
Written By
Last Updated : शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (09:16 IST)

5th October World Teachers Day 2024: भारत का साजरा करतो शिक्षक दिन, जाणून घ्या

Teacher's Day 2024: 5 ऑक्टोबर या दिवशी जगभरामध्ये जागतिक शिक्षक दिन World Teachers Day किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन International Teachers Day साजरा केला जातो. विसाव्या शतकापासून विविध देशांमध्ये शिक्षक दिन साजरे केले जातात.भारतामध्ये शिक्षक दिन 1962 पासून तर जगभरात 1994 पासून साजरा केला जात आहे.
 
1966 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटना( ILO )आणि युनेस्को(UNESCO) यांनी शिक्षकांच्या  दर्जा संदर्भात एक महत्वपूर्ण शिफारस स्वीकारली. देशभरातील शिक्षकांच्या सन्मानार्थ आज शिक्षक दिनाचे आयोजन केले जाते. भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे आयोजन केले जाते. तर, जागतिक शिक्षक दिनाचे आयोजन एका महिन्यानंतर म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी केले जाते. ही अभियान किंवा कॅम्पेन हे दरवर्षी वेगवेगळे असते. सन 2017 मध्ये एम्पाॅवरिंग टीचर्स नावाची थीम घेऊन जगभरात युनेस्कोने कॅम्पेन चालवले. सन 1997 मध्ये य उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये असलेल्या स्थितीबाबत जे काम केले.
 
2018 मध्ये युनेस्को ने “Right to education means right to a qualified teacher ” हे अभियान चालवले. सन 1948 मध्ये मानवी हक्कांचे डिक्लेरेशन झाले. त्याचे स्मरण म्हणून वरील प्रकारचे अभियान युनेस्कोने चालवले होते.
 
1994 साली जागतिक शिक्षक दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. 1994 मध्ये UNESCO ने 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जगभरात तो साजरा केला जाऊ लागला. जागतिक शिक्षक दिन दरवर्षी नवीन थीमसह आयोजित केला जातो.
 
जगभरातील जवळजवळ शंभरापेक्षा जास्त देश हा शिक्षक दिन विविध उपक्रम राबवून साजरा करतात. युनेस्कोचे कॅम्पेन जगभर राबवले जाते. असे असले तरीही काही देश आपल्या परंपरा आणि संस्कृतीनुसार वेगवेगळ्या दिवशी येईल शिक्षक दिन साजरा करत असतात.  भारतात  5 सप्टेंबरला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी शिक्षक दिन साजरा केला जातो.
 
ऑस्ट्रेलियामध्ये मात्र कोणतीच तारीख शिक्षक दिनासाठी निश्चित नाही. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी शिक्षक दिन साजरा केला जातो.
 
अर्जेंटीनामध्ये डाॅमिंगो फाॅस्टिनो सारमिएन्टोस यांच्या स्मृतिदिनी 11 सप्टेंबरला सण 1915 पासून शिक्षक दिन साजरा केला जातो. 
 
सॉक्रेटिस हा जगप्रसिद्ध शिक्षक आणि तत्त्वज्ञानी म्हणून प्रसिद्ध होता. त्यांची शिकवण्याची पद्धत ही एक आगळी वेगळी पद्धत होती. त्याने शिक्षकांची प्रतिज्ञा दिलेली आहे. ही प्रतिज्ञा सुद्धा अनेक देशात शिक्षक दिनी म्हटली जाते.
 
जागतिक स्तरावर जागतिक शिक्षक दिन साजरा करून शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला जातो. शिक्षक जागतिक संस्कृतीचा पायाभूत घटक असून संस्कृतीचा मूल्यवर्धक समजला जातो.
 
शिक्षकाचे कोणत्याही व्यक्तीच्या जीवन विकासामध्ये अनमोल असे योगदान असते. शिक्षकाच्या विविध प्रकारच्या कार्यातून समाज घडत असतो. शिक्षकाचे ही महत्त्वपूर्ण कार्य कुठेतरी गौरविले जावे म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो.
 
शिक्षक दिनाच्या निमित्ताने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना विविध सन्मान आणि पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. युनेस्को सुद्धा शिक्षकांचा गौरव करत असते.
Edited by - Priya Dixit