शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (12:58 IST)

वास्तू टिप्स: घराला पेंट करवण्यासाठी योग्य रंगांची निवड करा, नाही राहणार पैशांची किल्लत

जसा जसा दिवाळीचा सण जवळ येत आहे लोक आपल्या घराची आणि दुकानाची साफ सफाईची तयारी सुरू करून देतात. लोक घराच्या भिंतींवर नवीन रंग लावून आपल्या घराला नवीन लुक देतात. पण बर्‍याच माहीत नसल्याने घराच्या भिंतीला पेंट करताना वास्तूच्या महत्वाला नजरअंदाज करण्यात येतो त्यामुळे नंतर बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागते. वास्तूमध्ये हिरव्या रंगाचा आपला वेगळा महत्त्व असतो म्हणून घराला रंग करवताना वास्तूच्या नियमांकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे.  
 
- भारतीय संस्कृतीत पिवळ्या रंगाचे फार महत्त्व आहे. पिवळा रंग मनाला शांती देतो. घरातील मुख्य खोलीत जर पिवळ्या रंगाचे पेंट लावले तर ते शुभ असत.  
 
- घरातील उत्तरी भाग आर्थिक संपन्नतेचा प्रतीक असतो म्हणून आपल्या घराची आर्थिक स्थितीत सुधार करण्यासाठी उत्तर दिशेच्या भिंतीवर हिरव्या रंगाचा पेट केल्याने फायदा मिळतो.  
 
- घराच्या भिंतीशिवाय दार आणि खिडक्यांना नेहमी डार्क रंगाचे पेंट करायला पाहिजे.  
 
- वास्तुशास्त्रानुसार हलक्या रंगाचे प्रयोग करणे नेहमी उत्तम असत. डार्क रंग जसे लाल, ग्रे आणि काळा रंग प्रत्येकाला सूट करत नाही. हे रंग तुमच्या घरातील एनर्जीला कमी करतात.  
 
घराच्या दिशेनुसार रंगांची निवड  
- नॉर्थ-ईस्टच्या दिशेसाठी हलका निळा.  
- पूर्वदिशेसाठी पांढरा किंवा हलका निळा.  
- दक्षिण-पूर्व दिशा ही अग्नीशी निगडित असते. म्हणून या दिशेच्या भिंतींवर केशरी, गुलाबी किंवा सिल्वर रंगानुसार पेंटचा वापर करायला पाहिजे.  
- उत्तर दिशेसाठी हिरवा रंग उपयुक्त असतो.  
- उत्तर-पश्चिम ही दिशा वार्‍याशी संबंधित असते म्हणून यासाठी पांढरा, हलका ग्रे आणि क्रीम रंगांचा वापर करणे शुभ मानले जाते.  
- दक्षिण दिशेसाठी लाल आणि पिवळा रंग उपयोगी असतो.  
- पश्चिमही दिशा जल तत्त्वाची असते म्हणून या दिशेसाठी निळा आणि पांढरा रंग सर्वश्रेष्ठ आहे.  
 
खोलीनुसार रंगांची निवड 
- मास्टर बेडरूमसाठी दक्षिण-पश्चिम दिशा शुभ मानली जाते म्हणून यात निळा रंग लावायला पाहिजे.  
- गेस्ट रूम किंवा ड्राइंग रूम उत्तर-पश्चिम दिशेत असायला पाहिजे. म्हणून या दिशेत पांढर्‍या रंगाचा वापर केला पाहिजे.  
- मुलांची खोली उत्तर-पश्चिम ही सर्वश्रेष्ठ दिशा आहे म्हणून या दिशेत मुलांच्या खोलीत पांढर्‍या रंगाचा वापर केला पाहिजे.  
- किचनच्या भिंतींचा रंग केशरी किंवा लाल असायला पाहिजे.  
- उत्तर-पश्चिम दिशा बाथरूमसाठी सर्वात योग्य असते म्हणून या भिंतींवर पांढरा रंग असायला पाहिजे.