मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

घरातील स्त्रिया अशा वागल्या तर पैसा, लक्ष्मी घरात टिकणार नाही

घरातील महिलेला लक्ष्मीचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे घरातील स्त्रीने अशा चुका मुळीच करू नये ज्याने कुटुंबावर संकट येईल. शास्त्राप्रमाणे स्त्रियांनी रात्री हे 5 काम करणे टाळावे. हे काम टाळल्यास घरात नेहमी सुख-समृद्धी नांदेल.
 
रात्री केर काढू नये हे तर सर्वांना माहीतच आहे परंतू कधी केर काढण्याची वेळ आलीच तर कचरा मात्र घराबाहेर फेकू नये. अर्थात रात्रीच्या वेळी घरातून कुठलाही कचरा बाहेर फेकणे टाळावे.
 
रात्रीच्या वेळेस बाहेरच्या व्यक्तीला दूध किंवा दही देऊ नये. असे केल्याने घरातील सुख-समृद्धी निघून जाते. म्हणून इतर अगत्य करताना दूध-दही देणे मात्र टाळावे.
 
रात्रीचं जेवण झाल्यावर घरात खरकटी भांडी ठेवू नये. भांडी स्वच्छ करून ठेवावी. लक्ष्मी मातेला खरकटी-उष्टी भांडी दिसल्यास ती त्या स्थळी जराही न थांबत निघून जाते.
 
रात्री झोपताना स्वत:च्या अगदी जवळ पाण्याने भरलेला तांब्या, बाटली किंवा ग्लास ठेवू नये. पाणी जरा अंतरावर ठेवल्यास हरकत नाही.
 
रात्री केस मोकळे सोडून झोपू नये. अनेक स्त्रियांना रात्री अशी सवय असते पण असे करणे चुकीचे आहे. याने वाईट शक्ती आकर्षित होते. याने स्त्रियांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि घरातील सुख-शांतीला नजर लागू शकते.