बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (15:05 IST)

Vastu Tips: मातीच्या या वस्तू आजच घरी आणा, उजळू शकते तुमचे नशीब

प्राचीन काळापासून मातीची भांडी वापरली जात आहेत. मात्र, सध्या मातीच्या भांड्यांची जागा प्लास्टिक किंवा अन्य धातूपासून बनवलेल्या भांड्यांनी घेतली आहे. पण आजही बहुतेक लोक सजावटीसाठी मातीपासून बनवलेल्या वस्तू वापरतात. वास्तुशास्त्रानुसार, मातीची भांडी माणसाचे बंद भाग्य उघडू शकतं. जाणकारांच्या मते घरामध्ये मातीची भांडी वापरणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की असे केल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. जाणून घ्या वास्तूमध्ये कोणत्या तीन मातीच्या वस्तू घरात ठेवणे शुभ मानले जाते.
 
मातीचा घडा - वास्तूनुसार घरात मातीचा घडा ठेवल्याने सुख-समृद्धी येते. मातीचे भांडे नेहमी उत्तर दिशेला ठेवावे. यासोबतच घागर कधीही रिकामा ठेवू नये. तसेही आयुर्वेदाचार्य सांगतात की मातीच्या भांड्यातील पाणी आरोग्यदायी असतं.
 
मातीची मूर्ती- वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या ठिकाणी मातीच्या देवतांच्या मूर्ती ठेवणे शुभ असते. त्यामुळे घरातील मंदिरात नेहमी मातीच्या देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात. या मूर्ती नेहमी घराच्या उत्तर-पूर्व किंवा नैऋत्य दिशेला ठेवाव्यात. अशाने केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते.
 
मातीचा दिवा- सध्या फार कमी लोक पूजेच्या ठिकाणी मातीचा दिवा वापरतात. मातीच्या दिव्याऐवजी धातूचा दिवा वापरला जातो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मातीचा दिवा लावणे शुभ असते. असे केल्याने घरात सकारात्मक उर्जा संचारते.