Daily Horoscope
✕

Evil Eye Remedy दृष्ट लागल्यास हा समस्यांना सामोरा जावं लागतं, उपाय जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 16 ऑगस्ट 2024 (16:18 IST)
 
एखाद्या व्यक्तीला वाईट नजरेची चिन्हे योग्य वेळी ओळखली तर काही उपाय करून तो वाईट नजरेपासून सहज दूर राहू शकतो. वाईट नजर लागण्याची लक्षणे आणि उपाय वास्तुशास्त्रात सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत, ज्याबद्दल आम्ही आज आपण येथे जाणून घेणार आहात.
 
कोणत्या ग्रहामुळे लागते दृष्ट ?
वास्तु शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र आणि राहू ग्रहाची स्थिती कमकुवत असते, त्यांच्यावर अनेकदा वाईट नजर असते. त्याचबरोबर ज्या लोकांच्या कुंडलीत शनि आणि मंगळाची स्थिती ठीक नाही अशा लोकांवरही लवकर परिणाम होतो.
 
दृष्ट लागल्याची लक्षणे
चांगली झोप घेतल्यानंतरही थकवा आणि अशक्तपणाची समस्या
सर्व वैद्यकीय अहवाल ठीक आल्यानंतरही पुन्हा पुन्हा आजारी पडणे
कुटुंबातील सदस्यांशी प्रत्येक विषयावर भांडणे आणि कुटुंबात सतत तणावाचे वातावरण
काम पुन्हा पुन्हा बिघडणे
आळशीपणा जाणवणे
सर्व वेळ दुःखी वाटणे
नको त्या घटना रोज घडणे
सर्व वेळ एकटे राहणे
 
वाईट नजर टाळण्याचे उपाय
मीठाच्या पाण्याचे स्नान- जर तुम्हाला वाईट नजर लागली असेल तर पाण्यात मीठ टाकून आंघोळ करावी. पाण्यात थोडे मीठ मिसळून अंघोळ केल्याने शरीर चांगले स्वच्छ होते. नकारात्मक ऊर्जा दूर होते, त्यामुळे आरोग्य सुधारते आणि प्रलंबित कामही हळूहळू पूर्ण होऊ लागते.
 
मुख्य दारावर आरसा लावणे- वास्तु शास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर आरसा लावणे शुभ ठरते. याने कुटुंबातील सदस्यांना दृष्ट लागत नाही आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. याने घरातील वास्तू योग्य राहते आणि प्रगती होते. याशिवाय कुटुंबातील कोणावर वाईट नजर असेल तर तीही कमी होईल.
 
सेफ्टी पिन लावणे- नेहमी वाईट नजरेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तुम्ही तुमच्या कपड्यांमध्ये सेफ्टी पिन लावा. सेफ्टी पिन नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखेल, ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि हळूहळू तुमचे प्रलंबित कामही पूर्ण होऊ लागेल. तथापि दर 6 ते 7 दिवसांनी सेफ्टी पिन बदलत रहा. जर तुमच्या कपड्यांवरील पिन पुन्हा-पुन्हा काळी होत असेल तर समजून घ्या की तुमच्यावर पुन्हा पुन्हा नजर लागत आहे.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.

सर्व पहा

Swami Samarth names for baby girl श्री स्वामी समर्थांच्या नावावरून मुलींसाठी सुंदर नावे

Chhath Puja 2026 Wishes in Marathi छठ पूजेच्या शुभेच्छा

२०२६ मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे? दीपदानाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

आयुष्यातील दुःख, संकट आणि दोष दूर होण्यासाठी गुरुवारी करावी श्री दत्तगुरूंची आराधना

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments